Home गडचिरोली लांझेडा–इंदिरानगर येथे “मन की बात” कार्यक्रम उत्साहात; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लांझेडा–इंदिरानगर येथे “मन की बात” कार्यक्रम उत्साहात; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
20
Oplus_131072

लांझेडा–इंदिरानगर येथे “मन की बात” कार्यक्रम उत्साहात; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शहराध्यक्ष तथा न.प. बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर प्रमुख उपस्थितीत ‘मन कि बात’ कार्यक्रम संपन्न

दि. 22/02/2026
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहरच्या वतीने लांझेडा–इंदिरानगर येथील शक्ती केंद्र, बूथ क्रमांक ८४ येथे पंतप्रधानांच्या “मन की बात” कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमस्थळी सकारात्मक ऊर्जा आणि राष्ट्राभिमानाची भावना अनुभवायला मिळाली. विविध घटकांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमास शहराध्यक्ष तथा नगरपरिषद बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला. यावेळी जिल्हा सचिव किसान मोर्चा नरेश हजारे, अनिल नैताम, सुरपाम ताई, शेटे ताई, लालाजी, मनोज जवादे, प्रमोद भांडेकर, प्रीतम चापले तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधानांनी मांडलेल्या सामाजिक, राष्ट्रीय आणि विकासाभिमुख विषयांनी उपस्थितांना प्रेरित केले. आत्मनिर्भरता, जनसहभाग, स्वच्छता, नवकल्पना आणि समाजहित या मुद्द्यांवर व्यक्त केलेले विचार नागरिकांना नवचैतन्य देणारे ठरले. कार्यक्रमानंतर उपस्थितांमध्ये सकारात्मक चर्चा रंगली आणि समाजहितासाठी अधिक सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. बूथस्तरावर अशा उपक्रमांमुळे संघटन अधिक बळकट होत असून नागरिकांशी थेट संवाद साधण्यास नवी ऊर्जा मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

शेवटी सर्वांनी राष्ट्रहित आणि सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!