
भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बरसागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरमोरीत “मन की बात” भाग 131 उत्साहात; शेतकरी-युवा-नारी सक्षमीकरणावर भर
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमाचा भाग 131 आरमोरी विधानसभा क्षेत्रात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष मा. रमेश बरसागडे, जि. उपाध्यक्ष मा. अनिल पोहनकर, तालुकाध्यक्ष तथा बूथ प्रमुख मा. पंकज खरवडे, नगर परिषद उपाध्यक्ष मा. विलास पारधी, अभियान सह-संयोजक मा. अनिल तिडके, सोशल मीडिया प्रमुख सूरज गुंडमवार, तालुका महामंत्री जितेंद्र ठाकरे आदींसह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी विषयांवर चिंतनपर चर्चा केली.
कार्यक्रमात शेतकरी सक्षमीकरण, विद्यार्थी व युवा विकास तसेच नारी शक्ती सक्षमीकरण या विषयांवर विशेष भर देण्यात आला. आधुनिक शेती तंत्रज्ञान, नैसर्गिक शेतीचा प्रसार आणि शासकीय योजनांचा लाभ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास व डिजिटल शिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. महिलांनी स्वयंसहाय्य गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साधून नेतृत्वात पुढे यावे, यावरही भर देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी समाजहिताच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग वाढविण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. “मन की बात” हा सकारात्मक परिवर्तनाला चालना देणारा संवादमंच असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.








