Home गडचिरोली गोकुळनगर येथे शिवमय वातावरणात शिवजयंती उत्साहात साजरी

गोकुळनगर येथे शिवमय वातावरणात शिवजयंती उत्साहात साजरी

0
18

गोकुळनगर येथे शिवमय वातावरणात शिवजयंती उत्साहात साजरी

 

नगर परिषद उपाध्यक्ष निखिल चरडे यांच्या पुढाकारातून महाप्रसाद वाटप; युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

 

दि. 19/02/2026

गडचिरोली: गोकुलनगर येथील वडाच्या झाडाजवळ आज हिंदवी स्वराज्याचे प्रणेते, रयतेचे राजे, लोककल्याणकारी शासक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. परिसर आकर्षक सजावट, फुलांची आरास आणि “जय शिवराय”च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी शिवरायांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा जागर केला.

 

या उपक्रमाचे नेतृत्व नगर परिषद उपाध्यक्ष निखिल चरडे यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून आजच्या युवकांसाठी मार्गदर्शक आहेत. समाजहित, शिस्त, संघटन आणि जनसेवा हीच खरी शिवभक्ती आहे. आपण सर्वांनी त्यांच्या आदर्शांवर चालत समाजाच्या विकासासाठी एकत्रितपणे कार्य केले पाहिजे.”

 

शिवजयंतीनिमित्त उपस्थित नागरिकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे युवकांनी स्वयंप्रेरणेने कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला, त्यामुळे कार्यक्रमाला अधिक रंगत आली.

 

या प्रसंगी सौ.साक्षी बोलुवार नगरसेविका ,स्वप्नील चौधरी, घनश्याम वाढई, आशिष वाढई, आकाश बोलुवार, सागर सोनटक्के, अनिकेत दांडीकर, संकेत येनप्रेडीवार, निलेश भोयर, रोहित पोटवार , पिंटू पुरावार प्रशांत वाढई टिकाराम समरीत यांसह अनेक शिवप्रेमी युवक व महिला प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने शिवरायांच्या विचारांचा प्रसार करण्याचा आणि समाजकार्यात सक्रिय राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

 

कार्यक्रमाच्या शेवटी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “जय शिवराय”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. गोकुलनगर परिसरात शिवमय उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!