Home गडचिरोली आंगणवाडी केंद्रातील शौचालय गैरवापर प्रकरण; तात्काळ चौकशीची मागणी

आंगणवाडी केंद्रातील शौचालय गैरवापर प्रकरण; तात्काळ चौकशीची मागणी

0
24

आंगणवाडी केंद्रातील शौचालय गैरवापर प्रकरण; तात्काळ चौकशीची मागणी

सिरोंचा (प्रतिनिधी): सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत रंगयापल्ली अंतर्गत आंगणवाडी केंद्र क्रमांक १ येथे बांधण्यात आलेले शौचालय वापरासाठी अयोग्य अवस्थेत असून, ते सध्या अन्नसाठवणुकीसाठी वापरले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे लहान मुलींच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित केंद्रात शौचालयाला दरवाजा नसणे, स्वच्छतेचा अभाव आणि पाण्याची सुविधा नसणे अशा त्रुटी असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रात सार्वजनिक निधीतून सुविधा उभारण्यात आल्याचे असताना त्या वापरात नसल्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिरोंचा यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, तसेच शौचालय त्वरित दुरुस्त करून बालकांच्या वापरासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच बांधकामासाठी मंजूर निधी व खर्चाची माहिती जाहीर करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!