Home गडचिरोली गडचिरोली येथे भाजप किसान मोर्चाची केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ वर कार्यशाळा व किसान...

गडचिरोली येथे भाजप किसान मोर्चाची केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ वर कार्यशाळा व किसान संमेलन संपन्न

0
30

गडचिरोली येथे भाजप किसान मोर्चाची केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ वर कार्यशाळा व किसान संमेलन संपन्न

 

गडचिरोली : भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा, गडचिरोलीच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ विषयावर कार्यशाळा तसेच किसान सम्मेलन यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यक्रमास माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मंचावर लोकसभा समन्व्यक प्रमोद पिपरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विलास भांडेकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका योगिता पिपरे, जेष्ठ महिला नेत्या प्रतिभा चौधरी, साईनाथ बुरांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा देशाच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा असून युवक, शेतकरी, महिला व आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कृषी बजेट 1.62 लाख कोटीने वाढवले, उत्पादन, उर्वरक सबसिडी वाढ, तकनीकी मदत आणि डिजिटल सल्ला, उच्च मूल्य पिकांचे प्रोत्साहन, मच्छीपालन, पशुपालन आणि मत्स्य क्षेत्रात भर, कृषी संशोधन व शिक्षण वाढवले, उच्च मूल्य आणि विविधीकरणावर फोकस,

टेक्नॉलॉजी-आधारित सल्ला आणि बेहतर उत्पादन क्षमता वाढवण्याच्या उपायांवर जोर आहे, जे उत्पादन वाढीस मदत करतील. 2026–27 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत, उत्पादन खर्च कमी करणाऱ्या उपाययोजना, उच्च उत्पन्न पिकांच्या प्रोत्साहन तरतुदी, आणि तंत्रज्ञान-आधारित सल्ला मिळण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल व आत्मनिर्भर भारताची संकल्पना अधिक मजबूत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना या अर्थ संकल्पात केंद्र सरकारच्या योजना व धोरणे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी युवक, नागरिकांन सोबतच शेतकऱ्यांवर असल्याचे त्यांनी सांगितले. संघटन मजबूत असेल तरच पक्ष मजबूत होतो, यावर त्यांनी विशेष भर दिला.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सुद्धा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मधील तरुण, शेतकरी, महिला तसेच विकासाभिमुख योजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी युवा मोर्चा कार्यकर्त्यांची भूमिका, जबाबदाऱ्या आणि आगामी काळातील रणनीती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सर्व उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या जनहितकारी धोरणांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!