
पञकार बांधवांकडून अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष मा. अँड. धर्मपाल मेश्राम यांचे स्वागत
गडचिरोली :अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष मा. अँड. धर्मपाल मेश्राम हे दोनदिवसीय गडचिरोली जिल्ह्याच्या दौवर्यावर आहेत त्यांच्या आगमनप्रसंगी आज शहरातील सर्किंट हाऊस येथे पत्रकार बांधवांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे उत्स्फूर्त व सन्मानपूर्वक स्वागत केले.
यावेळी सामाजिक न्याय, वंचित घटकांचे हक्क, तसेच अनुसूचित जाती व जमाती समाजाशी संबंधित प्रश्नांवर आयोगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून मा. मेश्राम यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात आयोगाच्या उपाध्यक्षांचा दौरा हा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
या स्वागतप्रसंगी अखंड न्यायदर्पण चे संपादक श्रीमंत सुरपाम, महाराष्ट्र माझा न्यूज चे संपादक कैलाश शर्मा, अखंड न्यायदर्पण च्या उपसंपादक तिलोतम्मा हाजरा, तसेच भारतीय जनता पार्टी चे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, रवी हे उपस्थित होते.
यावेळी पत्रकार बांधवांनी जिल्ह्यातील सामाजिक, प्रशासकीय व जनतेशी संबंधित विविध विषयांवर संवाद साधत आयोगाकडून अपेक्षा व्यक्त केल्या. मा. अँड. धर्मपाल मेश्राम यांनीही पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधत समाजातील दुर्बल घटकांच्या न्यायहक्कांसाठी आयोग कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
सदर स्वागत कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला. गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने हा दौरा सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.








