Home गडचिरोली नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहर स्वच्छतेकडे ठोस वाटचाल। 

नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहर स्वच्छतेकडे ठोस वाटचाल। 

0
33

नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहर स्वच्छतेकडे ठोस वाटचाल।

 

साफ गुजरी, निरोगी शहर; साफसफाई व नाली सफाईमुळे नागरिकांच्या अडचणीचे निराकरण

 

दि. 09/02/2026

गडचिरोली :नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी बनविण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने शहरातील गुजरी व गुजरी परिसराची पाहणी नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन केली.

 

या पाहणीदरम्यान गुजरी परिसरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढिग, अस्वच्छता व दुर्गंधी, तसेच नाल्यांमध्ये साचलेला कचरा आढळून आला. ही बाब गांभीर्याने घेत नगराध्यक्षांनी तात्काळ संबंधित विभागाला सूचना देत सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कचरा उचल, परिसर स्वच्छता तसेच नाल्यांची सखोल स्वच्छता करण्यास सांगितलं. पाहणीदरम्यानच साफसफाईची कामे युद्धपातळीवर करण्यास सांगितलं आहे

 

यावेळी नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्यासमवेत आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे, उपशिक्षण सभापती शिल्पा नेमके, नगरसेवक सागर निंबोरकर, नगरसेवक शेखर आखाडे उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे परिसरातील स्वच्छतेशी संबंधित समस्या प्रत्यक्ष पाहून त्यावर त्वरित उपाययोजना केल्या.

 

नगराध्यक्षांनी यावेळी भाजीपाला विक्रेते व स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या दैनंदिन अडचणी, स्वच्छतेबाबतच्या समस्या तसेच नाल्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. कचरा योग्य ठिकाणी टाकणे, ओला व सुका कचरा वेगळा ठेवणे, नाल्यांमध्ये कचरा न टाकणे आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे याबाबत नागरिकांना मार्गदर्शनही करण्यात आले.

 

“शहर स्वच्छता ही केवळ नगर परिषदेची जबाबदारी नसून, त्यात नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. स्वच्छ गडचिरोली हेच आपले ध्येय असून, स्वच्छ नाले व स्वच्छ परिसर यासाठी सातत्याने कारवाई केली जाईल,” असे मत नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी व्यक्त केले.

 

या पाहणी व नाली व परिसराच्या त्वरित स्वच्छतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, भविष्यातही अशाच नियमित पाहण्या व स्वच्छता मोहिमा राबविण्याचे संकेत नगर परिषदेच्या वतीने देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!