Home गडचिरोली अंतिम षटकातील षटकारावर शिवनेरी वॉरियर्सची बाजी; अप्पर-डिप्पर क्रिकेट स्पर्धेचे विजेते

अंतिम षटकातील षटकारावर शिवनेरी वॉरियर्सची बाजी; अप्पर-डिप्पर क्रिकेट स्पर्धेचे विजेते

0
12

अंतिम षटकातील षटकारावर शिवनेरी वॉरियर्सची बाजी; अप्पर-डिप्पर क्रिकेट स्पर्धेचे विजेते

 

रोमांचक अंतिम सामन्यात सिंहगड लायन्सचा पराभव; सिझन–8 यशस्वीरित्या संपन्न

 

गडचिरोली :

शहरातील शिवाजी महाविद्यालयाजवळील स्व. ना. सा. गंगूवार मैदानावर अप्पर-डिप्पर ग्रुपतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धा सिझन–8 मध्ये शिवनेरी वॉरियर्स संघाने अंतिम षटकात षटकार लगावत ऐतिहासिक विजय मिळवला. रविवार, 1 फेब्रुवारी रोजी झालेल्या अंतिम सामन्यात शिवनेरी वॉरियर्सने सिंहगड लायन्स संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले, तर सिंहगड लायन्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

 

24 जानेवारीपासून सुरू झालेली ही स्पर्धा सलग आठ दिवस चालली. स्पर्धेत शिवनेरी वॉरियर्स, सिंहगड लायन्स, रायगड रॉयल्स व प्रतापगड पँथर्स असे चार संघ सहभागी झाले होते. लीग सामन्यांत पिछाडीवर असलेला शिवनेरी वॉरियर्स संघ प्रतापगड पँथर्सवर विजय मिळवून उपांत्य फेरीत पोहोचला. त्यानंतर रायगड रॉयल्स संघावर मात करत त्यांनी अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे, सिंहगड लायन्स संघाने लीग टप्प्यातच दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते.

 

अंतिम सामन्यात शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर उज्जैर शेख यांनी लगावलेला निर्णायक षटकार सामन्याचा निकाल ठरवणारा ठरला आणि शिवनेरी वॉरियर्स संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले.

 

स्पर्धेचा समारोप बोदली येथील समशेर खान पठाण यांच्या एन.एस. सेलेब्रेशन सभागृहात पार पडला. पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते भोलू सोमनानी, माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते समशेर पठाण, सर्जन डॉ. यशवंत दुर्गे, अनुराग पिपरे, निखिल मंडलवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजेत्या संघातील खेळाडूंना आकर्षक चषक व रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली.

 

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अप्पर-डिप्पर ग्रुपच्या संस्थापक सदस्यांसह सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!