
सामान्यांसाठी जीवनदायी ठरणारी अर्थसंकल्प – डॉ. देवराव होळी
*केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यातून शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे. आधुनिक काळात अनेक समस्या जटिल होत असल्याने युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना उभारी देण्यासाठी सवलती देण्यात आल्या आहेत. यावेळी माजी आमदार डॉ. होळी यांनी आपल्या आमदारकीच्या 10 वर्षाच्या कालखंडा मध्ये रबविलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी उद्योग क्रांती सुरु केली होती. त्याच धर्तीवर आज अर्थमंत्री सितारामन यांनी आपल्या अर्थ संकल्पात विशेष भर दिला आहे. विशेष उल्लेख यासोबतच कृषीविषयक बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत. शिक्षण क्षेत्र बळकट करण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्यास संधी मिळणार आहे. उद्योग क्षेत्र बळकट करण्यावरही या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याने, हा अर्थसंकल्प देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा स्वप्न पूर्ण करणारा असून या अर्थ संकल्पात सर्वसामान्य नागरिकांचे हित लक्षात घेणारा अर्थ संकल्प आहे, असे माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी सांगितले.*








