
गडचिरोलीतील ‘कोया किंग & कोया क्वीन’ कार्यक्रम रद्द
सर्व नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनम्र सुचना
दिं. 28/01/2026
गडचिरोली:आज संपूर्ण महाराष्ट्राला दुःखद बातमी मिळाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे आज विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या अकस्मात जाण्यामुळे संपूर्ण राज्य शोकाकुल झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि हिरा सुखा सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने नियोजित ‘कोया किंग & कोया क्वीन’ सांस्कृतिक महोत्सव – पर्व ३ चे आज आणि उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
सर्वांनी याची नोंद घ्यावी व या दु:खद प्रसंगात संयम बाळगावा, अशी आम्ही नम्र विनंती करतो.
अजितदादा पवार यांचे योगदान महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात अमूल्य होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवकांना प्रेरणा मिळाली, आणि राज्याच्या विकासासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली.
या दु:खद प्रसंगात, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, जिल्हा गडचिरोली शोकसह आपल्या श्रद्धांजली अर्पण करते.
धन्यवाद
आपले विनीत,
राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, जिल्हा गडचिरोली








