Home Breaking News २९ सप्टेंबरचा रोजगार मेळावा आचारसंहितेमुळे स्थगित — प्रा. रमेश बारसागडे

२९ सप्टेंबरचा रोजगार मेळावा आचारसंहितेमुळे स्थगित — प्रा. रमेश बारसागडे

0
3
Oplus_131072

२९ सप्टेंबरचा रोजगार मेळावा आचारसंहितेमुळे स्थगित — प्रा. रमेश बारसागडे

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; आचारसंहिता संपल्यानंतर रोजगार मेळाव्याची नवीन तारीख जाहीर होणार

गडचिरोली, दि. २४ सप्टेंबर २०२६ : सेवा संकल्प अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला रोजगार मेळावा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपा गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी दिली आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर दि. २९ सप्टेंबर रोजी नियोजित रोजगार मेळावा सध्या पुढे ढकलण्यात आला आहे.

आचारसंहिता संपल्यानंतर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून, त्याची नवीन तारीख निश्चित झाल्यानंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे प्रा. रमेश बारसागडे यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याची तयारी करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी दि. २९ सप्टेंबरचा रोजगार मेळावा स्थगित करण्यात आल्याची नोंद घ्यावी. नवीन तारीख जाहीर झाल्यानंतर त्याबाबत सर्वांना कळविण्यात येईल.

तसेच रोजगार मेळाव्याबाबत पुढील अधिकृत सूचना मिळेपर्यंत कोणताही संभ्रम बाळगू नये आणि सुधारित तारखेची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!