Home Breaking News भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रभर ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रम*

भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रभर ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रम*

0
16

*भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रभर ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रम*

 

गडचिरोली : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत १७ सप्टेंबर रोजी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्राच्या वतीने ‘आशीर्वादाचा दिवा’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. परभणी, गडचिरोली, सोलापूर, नाशिक, पालघर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांनी आपल्या घरी दीप प्रज्वलित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

‘आशीर्वादाचा दिवा’ या उपक्रमाच्या माध्यमातून देशसेवेसाठी कार्यरत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दीपप्रज्वलनाचे छायाचित्रे घेऊन ती भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या संबंधित गटांमध्ये शेअर केली.

सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाचा संकल्प अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानात महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. आगामी काळातही अभियानांतर्गत विविध सेवाभावी व जनसंपर्काचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!