
देसाईगंज येथे भाजपा तर्फे सेवा संकल्प अभियान निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
‘विकसित भारताचा संकल्प’ ते ‘स्वप्नांचा भारत’; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग — विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
देसाईगंज, दि. १७ सप्टेंबर २०२६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी देसाईगंज युवा मोर्चा, महिला मोर्चा व ओबीसी मोर्चाच्या वतीने सेवा सप्ताहांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी सिंधू भवन, देसाईगंज येथे भाषण, चित्रकला, रांगोळी आणि रिल्स स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना विद्यार्थी, युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘विकसित भारताचा संकल्प’, ‘स्वप्नांचा भारत’ तसेच ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनकल्याणकारी योजना’ अशा विविध विषयांवर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी स्पर्धकांनी आपल्या कल्पना, विचार आणि सर्जनशीलतेचे प्रभावी सादरीकरण केले.
यावेळी माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देताना त्यांनी उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. जन्मदिनानिमित्त सायंकाळी प्रत्येकाने आपल्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’ लावून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सेवा सप्ताहाच्या माध्यमातून समाजाशी जोडले जाणे आणि सेवाभावाची भावना वृद्धिंगत करणे हा उद्देश असल्याचे गजबे यांनी सांगितले. ‘विकसित भारताचा संकल्प’ हा केवळ भाषणाचा विषय न राहता प्रत्येकाने आपल्या क्षेत्रातून योगदान देण्याचा संकल्प करावा, असे त्यांनी नमूद केले. युवक व विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला योग्य व्यासपीठ मिळाल्यास राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेला बळ मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला माजी आमदार कृष्णाजी गजबे, भाजपा जिल्हा सचिव राजेश जेटानी, सचिन वानखेडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य योगेश नागतोडे, वसंता दोनाडकर, भाजपा औद्योगिक आघाडी जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल, देसाईगंज नगराध्यक्ष लता सुंदरकर, उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी, भाजपा महिला मोर्चा महामंत्री प्रीती शंभरकर, माजी सभापती रोशनी पारधी, तालुकाध्यक्ष (ग्रामीण) सुनील पारधी, शहराध्यक्ष सचिन खरकाटे, महिला तालुकाध्यक्ष (ग्रामीण) अर्चना ढोरे, तालुका महामंत्री मोहन गायकवाड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आदित्य पारधी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष शंकर पारधी, शिक्षण सभापती बाळू माडुलवार, आरोग्य सभापती चैतन्यदास विधाते, महिला व बालविकास सभापती भावीआ साधवानी, नगरसेवक विलास लोखंडे, नगरसेविका पल्लवी मेंढे, भारती कुथे, लता मुळे, ज्योशना लुटे, माणिक बनसोड, चक्रधर नाकाडे, श्यामा अलवणे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते
भाषण स्पर्धा — ‘विकसित भारताचा संकल्प’
प्रथम — विधी भास्कर बनसोड
द्वितीय — अंजली दुणेदार
तृतीय — गौरी विठ्ठल झिलपे
चित्रकला स्पर्धा — ‘स्वप्नांचा भारत’
प्रथम — पियुष चौधरी
द्वितीय — गौरी विठ्ठल झिलपे
तृतीय — भुवस्व मनोज इरले
रिल्स स्पर्धा — ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनकल्याणकारी योजना’
प्रथम — यश पारधी
द्वितीय — गोलू ठेंगरी
तृतीय — पुष्कर पारधी
रांगोळी स्पर्धा
प्रथम — निर्भय रमेश राकडे
द्वितीय — दिव्या हरिचंद्र मेश्राम
तृतीय — निखिल होमराज प्रधान
सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून केवळ बघमारे, तुळशीदास शहारे, संदीप प्रधान व मनोज इरले यांनी काम पाहिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा पदाधिकारी तसेच युवा मोर्चा, महिला मोर्चा व ओबीसी मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.








