
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत ‘माणुसकीचा घास’ सेवा उपक्रम
महिला रुग्णालयात रुग्ण व गरजूंसाठी सेवाभावी उपक्रम; समाजसेवेतून वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प
गडचिरोली, दि. १७ सप्टेंबर २०२६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष, गडचिरोली शहराच्या वतीने विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून गडचिरोली येथील महिला रुग्णालयात ‘माणुसकीचा घास’ हा सेवाभावी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत असून, महाराष्ट्रातही विविध सेवाभावी व जनजागृतीपर उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजित ‘माणुसकीचा घास’ उपक्रमाच्या माध्यमातून रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच गरजू नागरिकांप्रती मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. समाजातील गरजू घटकांना मदत करणे, आरोग्याविषयी जनजागृती वाढविणे आणि सेवाभावाची भावना अधिक दृढ करणे हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध भागांत आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहिमा, रक्तदान तसेच इतर सेवाभावी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
“वाढदिवसाचा उत्सव केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजूंच्या सेवेतून साजरा करणे, हाच मानवतेचा खरा संदेश आहे,” अशी भावना या उपक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात नगराध्यक्षा अॅड. प्रणोती सागर निंबोरकर, भाजप जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, उपाध्यक्ष निखिल चरडे, बांधकाम सभापती अनिल कुणघाडकर, रमेश भुर्से, शिक्षण सभापती हर्षल गेडाम,,जेष्ट नेते घनश्याम वाढई तसेच नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह महिला कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होते.








