Home Breaking News चामोर्शीत भाजपा मंडळाची ‘सेवा संकल्प अभियान’ बैठक उत्साहात

चामोर्शीत भाजपा मंडळाची ‘सेवा संकल्प अभियान’ बैठक उत्साहात

0
14
Oplus_131072

चामोर्शीत भाजपा मंडळाची ‘सेवा संकल्प अभियान’ बैठक उत्साहात

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष क्र. २ येथे अभियानाच्या विविध उपक्रमांचे नियोजन

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा

चामोर्शी : दि. १२ सप्टेंबर २०२६

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध सेवा व जनसंपर्क उपक्रमांचे प्रभावी नियोजन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी चामोर्शी मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या चामोर्शी येथील कर्तव्य कक्ष क्र. २ येथे उत्साहात पार पडली.

 

बैठकीत सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जबाबदारी, बूथ स्तरावरील सहभाग तसेच अभियान अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

अभियानाच्या माध्यमातून सेवा, जनसंपर्क आणि संघटनात्मक कार्याला अधिक गती देत प्रत्येक बूथपर्यंत विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

 

या बैठकीला भाजपा तालुका अध्यक्षा रोशनीताई वरघंटे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष नीरज रामानुजनवार, भाजयुमो जिल्हा सचिव नरेंद्र कुमार अलसावार, तालुका महामंत्री संजय खेडेकर, विष्णू ढाली, भाजयुमो तालुका अध्यक्ष भुवनेश्वर चौधरी, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा कविताताई किरमे, महिला मोर्चा तालुका महामंत्री तृप्तीताई चिळंगे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष रोहिदास धोटे, महादेव निकोडे, तालुका उपाध्यक्ष हर्षद भांडेकर, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष संजय चलाख, तालुका सचिव दीपक भांडेकर, भारत धोडरे, भाजयुमो तालुका महामंत्री गितेश बारसागडे, रामचंद्र वरवाडे, सुजित मंडल, विशाल माळवे, सोशल मीडिया प्रमुख प्रलय सहारे, विनोद किरमे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, बूथ प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!