Home Breaking News गडचिरोलीत तान्हा पोळ्याचा उत्साह; नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांच्या...

गडचिरोलीत तान्हा पोळ्याचा उत्साह; नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांच्या हस्ते बालगोपालांना भेटवस्तू

0
23
Oplus_131072

गडचिरोलीत तान्हा पोळ्याचा उत्साह; नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांच्या हस्ते बालगोपालांना भेटवस्तू

बालगोपालांनी आकर्षक पारंपरिक वेशभूषेत वेधले लक्ष; सजवलेल्या लाकडी-मातीच्या बैलजोड्यांनी वाढवली तान्हा पोळ्याची शोभा

नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर व नगरसेवक सागर अरुण निंबोरकर यांनी चिमुकल्यांचे कौतुक करत दिल्या शुभेच्छा

गडचिरोली : दि. 11/09/2026

लहान मुलांचा आवडता आणि महाराष्ट्राच्या समृद्ध कृषी संस्कृतीशी नाते सांगणारा तान्हा पोळा सण गडचिरोली शहरात मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर व नगरसेवक सागर अरुण निंबोरकर यांनी चिमुकल्यांचे कौतुक करून त्यांना भेटवस्तू दिल्या.

तान्हा पोळ्यानिमित्त बालगोपालांनी आकर्षक पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धोतर-कुर्ता, फेटा तसेच विविध पारंपरिक पोशाखांमध्ये सजलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लहान मुलांनी आकर्षक पद्धतीने सजवलेल्या लाकडी व मातीच्या बैलजोड्या आणल्या होत्या. रंगीबेरंगी बैलजोड्या, फुलांची आकर्षक सजावट आणि बालगोपालांच्या पारंपरिक वेशभूषेमुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी मुलांनी आपल्या बैलजोड्यांची विधिवत पूजा करून नैवेद्य दाखवला. नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर व नगरसेवक सागर अरुण निंबोरकर यांनी उपस्थित बालगोपालांशी संवाद साधत त्यांच्या आकर्षक वेशभूषेचे आणि सजवलेल्या बैलजोड्यांचे कौतुक केले. तसेच चिमुकल्यांना भेटवस्तू देऊन तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या.

तान्हा पोळा हा केवळ मुलांच्या आनंदाचा सण नसून शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नाते, कष्टाचे महत्त्व आणि आपल्या समृद्ध कृषी संस्कृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण आहे.

लहान मुलांना आपल्या परंपरा आणि संस्कृतीची ओळख व्हावी, सण-उत्सवांचे महत्त्व समजावे आणि ही समृद्ध परंपरा पुढील पिढीपर्यंत कायम राहावी, यादृष्टीने तान्हा पोळ्याला विशेष महत्त्व आहे.

आकर्षक पारंपरिक वेशभूषेतील बालगोपाल, रंगीबेरंगी सजवलेल्या बैलजोड्या आणि चिमुकल्यांचा उत्साह यामुळे गडचिरोलीतील तान्हा पोळा सोहळा विशेष आकर्षणाचा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!