Home Breaking News सावरखेडा ग्रामपंचायतीच्या निधी गैरव्यवहाराला अखेर कायद्याचा दणका! माजी सरपंच तथा विद्यमान प्रशासकासह...

सावरखेडा ग्रामपंचायतीच्या निधी गैरव्यवहाराला अखेर कायद्याचा दणका! माजी सरपंच तथा विद्यमान प्रशासकासह ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

0
6

सावरखेडा ग्रामपंचायतीच्या निधी गैरव्यवहाराला अखेर कायद्याचा दणका! माजी सरपंच तथा विद्यमान प्रशासकासह ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

 

गडचिरोली: सावरखेडा ग्रामपंचायतीच्या निधीच्या वापरात आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून माजी सरपंच तथा विद्यमान प्रशासक अविनाश टेकाम आणि ग्रामपंचायत अधिकारी दिवाकर निंदेकर यांच्याविरुद्ध आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ग्रामपंचायत पातळीवरील आर्थिक व्यवहार आणि निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.कुरखेडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत) उराडे यांनी याप्रकरणी आरमोरी पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. सावरखेडा ग्रामपंचायतीच्या निधीचा वापर करताना नियमबाह्य पद्धतीने आर्थिक व्यवहार व अनियमितता झाल्याचा ठपका तक्रारीत ठेवण्यात आला आहे. तक्रारीची दखल घेत आरमोरी पोलिसांनी संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व तपास सुरू असल्याची माहिती आरमोरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप मोहुर्ले यांनी दिली.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या मागील पाच वर्षांतील विकासकामे, मंजूर निधी, प्रत्यक्ष खर्च, देयके, कामांची गुणवत्ता तसेच निधीच्या वापराची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. ग्रामपंचायत निधी हा जनतेच्या विकासासाठी असतो. त्यामुळे निधीच्या प्रत्येक रुपयाचा हिशेब पारदर्शकपणे जनतेसमोर यावा आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!