Home Breaking News सोशल मीडिया जिल्हा संयोजक सुरज गुंडमवार यांच्या निवासस्थानी गणरायाचे डॉ. देवराव होळी...

सोशल मीडिया जिल्हा संयोजक सुरज गुंडमवार यांच्या निवासस्थानी गणरायाचे डॉ. देवराव होळी यांनी घेतले दर्शन

0
36
Oplus_131072

सोशल मीडिया जिल्हा संयोजक सुरज गुंडमवार यांच्या निवासस्थानी गणरायाचे डॉ. देवराव होळी यांनी घेतले दर्शन

गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला सदिच्छा भेट; गुंडमवार कुटुंबीयांशी साधला स्नेहपूर्ण संवाद

गडचिरोली, दि. १८ सप्टेंबर २०२६ : भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक सुरज गुंडमवार यांच्या निवासस्थानी विराजमान श्री गणरायाचे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी गुंडमवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत श्री गणरायाची पूजा-अर्चना केली आणि कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण संवाद साधला.

गुंडमवार कुटुंबीयांच्या वतीने यंदाही घरगुती वातावरणात गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त कुटुंबात भक्तिमय वातावरण असून, आज 11.00 वाजता श्री गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. त्यानिमित्त डॉ. होळी यांनी आज निवासस्थानी भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले.

यावेळी सुरज गुंडमवार व त्यांच्या कुटुंबीयांनी डॉ. होळी यांचे स्वागत केले. घरगुती गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत सामाजिक तसेच स्थानिक विषयांवर अनौपचारिक संवादही झाला. श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

गणेशोत्सव हा श्रद्धेबरोबरच कुटुंब आणि समाजाला एकत्र आणणारा उत्सव असून, डॉ. होळी यांच्या या सदिच्छा भेटीमुळे गुंडमवार कुटुंबीयांच्या गणेशोत्सवातील आनंद द्विगुणित झाला. आज गणरायाचे विसर्जन होणार असल्याने कुटुंबीयांमध्ये भक्तीभावासोबतच बाप्पाला निरोप देण्याची भावुकताही पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!