
मार्कंडादेव येथे श्रावणातील शेवटच्या सोमवारी गंगा आरतीचा भव्य सोहळा; आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती
विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गंगा पूजन; मार्कंडादेवच्या पावन भूमीत जनतेच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना
राज्यसभा खासदार मयताई इवनाते, माजी खासदार अशोक नेते,माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची उपस्थिती
गडचिरोली : पवित्र श्रावण मासाच्या शेवटच्या सोमवारी गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध मार्कंडादेव तीर्थक्षेत्री भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणात गंगा आरती व गंगा पूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास प्रमुख यजमान म्हणुन भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार प्रमुख उपस्थितीत होते. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी आणि हजारो भाविक सहभागी झाले.
श्रावणातील शेवटचा सोमवार आणि मार्कंडादेव तीर्थक्षेत्राचे धार्मिक महत्त्व यामुळे परिसरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मंत्रोच्चार, हर हर महादेवचा जयघोष आणि गंगा आरतीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. उपस्थित मान्यवरांनी गंगा पूजन व आरतीत सहभागी होत पूजेचा लाभ घेतला.
मार्कंडादेवच्या पावन भूमीत नतमस्तक होत समस्त जनतेच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही गंगा पूजन व आरतीत सहभाग घेतला.
या धार्मिक सोहळ्याला राज्यसभा खासदार मयताई इवनाते, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते, भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, ज्येष्ठ नेते डॉ. भारत खटी, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, भाजपा आदिवासी मोर्चाचे जिल्हा महामंत्री रेवनाथ कुसराम, भाजपा चामोर्शी तालुकाध्यक्षा रोशनी वरघंटे, भाजपा गडचिरोली ग्रामीण तालुकाध्यक्ष दत्तू सूत्रपवार, भाजपा गडचिरोली शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजयुमोचे नरेश अलसावार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच गडचिरोली नगर परिषदेचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, परिसरातील साधू-संत, विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो नागरिक व भाविकांनी या सोहळ्यात सहभाग नोंदविला.
गंगा आरतीच्या वेळी दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेला परिसर, मंत्रोच्चार आणि ‘हर हर महादेव’ च्या जयघोषाने मार्कंडादेव तीर्थक्षेत्रातील वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. श्रावण मासाच्या शेवटच्या सोमवारचा हा सोहळा हजारो भाविकांसाठी श्रद्धा आणि अध्यात्माची अनुभूती देणारा ठरला.








