
गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा; ‘स्वतंत्र प्रादेशिक विकास मंडळ’ स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय_ जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे
ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांनी मानले मनःपूर्वक आभार
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि गतिमान विकासाला चालना देण्यासाठी ‘स्वतंत्र प्रादेशिक विकास मंडळ’ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी स्वतंत्रपणे नियोजन करून स्थानिक गरजा आणि प्राधान्यक्रमानुसार विविध विकासकामांना गती मिळणार आहे. विशेषतः स्थानिक गरजांना प्राधान्य, पायाभूत सुविधांचा विस्तार, रोजगारनिर्मिती आणि सर्वांगीण विकासाला यामुळे मोठी चालना मिळेल.
गडचिरोलीच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून सातत्याने सकारात्मक निर्णय घेतले जात असून, ‘स्वतंत्र प्रादेशिक विकास मंडळ’ ही त्याच विकासदृष्टीची महत्त्वपूर्ण पायरी आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांनी व्यक्त केला.
“नव्या गडचिरोलीचा नवा विकास” या संकल्पनेला बळ देणाऱ्या या निर्णयाचे जिल्ह्यात सर्व स्तरातून स्वागत होत असून, गडचिरोलीच्या विकासाचा वेग आणखी वाढणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.








