Home गडचिरोली गडचिरोली जिल्हा छायाचित्रकार असोसिएशनतर्फे जागतिक छायाचित्र दिन उत्साहात

गडचिरोली जिल्हा छायाचित्रकार असोसिएशनतर्फे जागतिक छायाचित्र दिन उत्साहात

0
17

गडचिरोली जिल्हा छायाचित्रकार असोसिएशनतर्फे जागतिक छायाचित्र दिन उत्साहात

 

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा छायाचित्रकार असोसिएशनच्या वतीने १९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिनानिमित्त निवासी अपंग विद्यालय लांजेडा येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 

कार्यक्रमादरम्यान छायाचित्रण क्षेत्राचे समाजातील महत्त्व, बदलते तंत्रज्ञान आणि डिजिटल युगातील छायाचित्रकारांसमोरील संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.आजच्या काळात एका छायाचित्रातून एखाद्या घटनेचा इतिहास, सामाजिक परिस्थिती तसेच व्यक्तीच्या भावना प्रभावीपणे मांडल्या जाऊ शकतात. त्यामुळे छायाचित्रकारांची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

 

नगराध्यक्ष ॲड.प्रणोती सागर निंबोरकर यांनी आपल्या भाषनातून सांगितले कि,छायाचित्रकारांच्या कार्याचे कौतुक करताना, “छायाचित्र हे केवळ एक चित्र नसून एखाद्या क्षणाची कायमस्वरूपी आठवण आणि इतिहासाचा दस्तऐवज असतो,” या भावनेतून छायाचित्रकारांनी आपल्या कलेला अधिकाधिक सामाजिक बांधिलकीची जोड द्यावी, असे आवाहन केले.

 

तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे छायाचित्रण क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. आधुनिक कॅमेरे, मोबाईल फोटोग्राफी, ड्रोन आणि डिजिटल माध्यमांमुळे छायाचित्रणाला नवे आयाम मिळाले आहेत. या बदलत्या काळानुसार छायाचित्रकारांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या कौशल्यात सातत्याने वाढ करावी, असेही मार्गदर्शन करण्यात आले.

 

यावेळी ॲड.प्रणोती सागर निंबोरकर नगराध्यक्ष नगरपरिषद गडचिरोली, श्री. भाष्कर दोनाडकर अधीक्षक, रवीभाऊ मेश्राम नगरसेवक, rahul भाऊ टहलीयानी, प्रवीण भाऊ बांदूरकर, नरेंद्र बोढाले व तसेच,जिल्हा छायाचित्रकार असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहून जागतिक छायाचित्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. छायाचित्रण क्षेत्रातील सर्व छायाचित्रकारांच्या कार्याचा गौरव करत भविष्यातही विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

 

“वेळेला आणि काळाला बांधते… ते म्हणजे छायाचित्र!” या संदेशातून छायाचित्रकारांच्या कलेचे महत्त्व अधोरेखित करत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!