Home गडचिरोली _विदर्भाची काशी मार्कंडा देवस्थान येथे प्रथमच वैनगंगेच्या तीरावर महागंगा पूजा-आरती_! नगराध्यक्ष नगरपरिषद...

_विदर्भाची काशी मार्कंडा देवस्थान येथे प्रथमच वैनगंगेच्या तीरावर महागंगा पूजा-आरती_! नगराध्यक्ष नगरपरिषद गडचिरोली ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांची विशेष उपस्थिती

0
37

_विदर्भाची काशी मार्कंडा देवस्थान येथे प्रथमच वैनगंगेच्या तीरावर महागंगा पूजा-आरती_! नगराध्यक्ष नगरपरिषद गडचिरोली ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांची विशेष उपस्थिती

 

गडचिरोली | दि. १७ ऑगस्ट २०२६

 

उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर वसलेले आणि ‘विदर्भाची काशी’ म्हणून श्रद्धास्थान लाभलेले चामोर्शी तालुक्यातील प्राचीन ऐतिहासिक मार्कंडेश्वर देवस्थान येथे श्रावणमासातील पहिल्याच सोमवारी प्रथमच ‘वैनगंगा नदीच्या तीरावर महागंगा पूजा-आरती’ भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून या अभिनव धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महागंगा पूजा-आरतीचे आयोजन करण्यात आले.

 

यावेळी नगराध्यक्ष नगरपरिषद गडचिरोली ॲड. प्रणोती सागर निंबोरक यांनी सर्वप्रथम मार्कंडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन मार्कंडेश्वर ऋषी देवाची विधिवत पूजा-अर्चना व आरती करून दर्शन घेतले. त्यानंतर वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर मंत्रोच्चारांच्या मंगलमय वातावरणात ‘ॐ नमः शिवाय’ तसेच महामृत्युंजय मंत्राचे पठण करण्यात आले.

 

शंखनाद, डमरूचा निनाद आणि हर हर महादेवच्या जयघोषात विधिवत गंगापूजन व महाआरती पार पडली. नदीच्या पवित्र प्रवाहासमोर दीपप्रज्वलन करत करण्यात आलेल्या या आरतीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पूजा-आरतीत सहभाग घेतला. **‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’**च्या जयघोषाने वैनगंगा तीर दुमदुमून गेला.

 

या ऐतिहासिक महागंगा पूजा-आरती सोहळ्यास सहाय्यक सुनीलजी मित्रा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे निकटवर्तीय अनिरुद्ध पालकर, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, नागपूरचे आमदार मोहनजी मते, जिल्हाधिकारी अविशयांत पंडा, जिल्हा अध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, गोविंद सारडा, प्रकाश गेडाम,संतोष भाऊ तंगडपल्लीवार, दिलीप चलाख,संजय बारापात्रे, चंद्रशेखर भडांगे,प्रकाश ताकसांडे,यश गण्यारपवार यांच्यासह मुरलीधर महाराज, नागपूरे महाराज व परिसरातील महाराज गण, तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते.

 

श्रावणाच्या पवित्र महिन्याच्या पहिल्याच सोमवारी वैनगंगेच्या तीरावर प्रथमच झालेल्या या महागंगा पूजा-आरतीमुळे मार्कंडा देवस्थानच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला, अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे मार्कंडा देवस्थानचे धार्मिक महत्त्व अधिक अधोरेखित होऊन वैनगंगा नदीच्या पावन तीराला नव्या आध्यात्मिक परंपरेची जोड मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!