Home गडचिरोली भाजपा महिला मोर्चा जिल्हा गडचिरोलीची महत्त्वपूर्ण बैठक १९ ऑगस्टला

भाजपा महिला मोर्चा जिल्हा गडचिरोलीची महत्त्वपूर्ण बैठक १९ ऑगस्टला

0
22

भाजपा महिला मोर्चा जिल्हा गडचिरोलीची महत्त्वपूर्ण बैठक १९ ऑगस्टला

 

गडचिरोली | दि. १७ ऑगस्ट २०२६

 

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार सौ. चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार भाजपा महिला मोर्चा जिल्हा गडचिरोलीची महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक महिला मोर्चा प्रदेश महामंत्री तथा जिल्हा प्रभारी श्रीमती अल्काताई आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हाध्यक्ष प्रा.रमेशजी बारसागडे,आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे,भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

 

ही महत्त्वपूर्ण बैठक बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष जनसंपर्क कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली आहे.

 

बैठकीत महिला मोर्चाच्या आगामी संघटनात्मक कार्याचा आढावा, विविध उपक्रमांचे नियोजन तसेच पक्ष संघटन अधिक बळकट करण्याबाबत चर्चा होणार आहे.

 

या बैठकीस भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सचिव व पूर्ण कार्यकारिणी, तालुका अध्यक्ष, तालुका महामंत्री, तालुका उपाध्यक्ष, तालुका सचिव,आजी – माजी भाजप महिला लोकप्रतिनिधी तिन्ही नगरपरिषदांचे नगराध्यक्ष, नगरसेविका, पदाधिकारी तसेच महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महिला मोर्चा जिल्हा महामंत्री सौ.लताताई पुंघाटी,सौ.अर्चनाताई बोरकुटे,श्रीमती प्रीतीताई शंभरकर,सौ.शालिनीताई पोहनेकर यांनी केले आहे.

 

तसेच सर्व बाराही तालुका अध्यक्षांनी बैठकीस येताना आपल्या तालुक्याची संपूर्ण कार्यकारिणी सोबत आणावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!