Home गडचिरोली अहेरी महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरा —माजी आमदार डॉ....

अहेरी महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरा —माजी आमदार डॉ. देवराव होळी

0
13

अहेरी महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरा —माजी आमदार डॉ. देवराव होळी

अहेरी : अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयाची भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील उपलब्ध वैद्यकीय सुविधा, रुग्णांना मिळणाऱ्या सेवा तसेच विविध विभागांतील रिक्त पदांची माहिती त्यांनी जाणून घेतली.
रुग्णालयात महिला व बाल रुग्णांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असताना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने आरोग्यसेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी रिक्त असलेली वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, तंत्रज्ञ व इतर आवश्यक पदे तात्काळ भरण्याची सूचना डॉ. देवराव होळी यांनी वैद्यकीय अधीक्षकांना केली.
रुग्णालयातील कोणत्याही विभागात मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रुग्णांना गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच आवश्यक पदांची माहिती व मागणीचा प्रस्ताव संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने पाठवून पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना केल्या. यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या सोबत MS डॉ. अनिल गेडाम, डॉ. शिवा कुंभारे, अजय ठाकरे तालुकाध्यक्ष बीजेपी, पप्पू मदिवार आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित डॉक्टर यांना सांगितले की
अहेरी व परिसरातील आदिवासी आणि ग्रामीण नागरिकांसाठी हे रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे असून, विशेषतः महिला व बालकांना वेळेत व दर्जेदार उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णालयातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची मागणी माजी आमदार डॉ. होळी यांनी केली.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक व रुग्णालयातील संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!