Home गडचिरोली “तीन वर्षांच्या धडाडीच्या कार्याची दखल; मनोज उराडे यांची विदर्भ विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती”

“तीन वर्षांच्या धडाडीच्या कार्याची दखल; मनोज उराडे यांची विदर्भ विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती”

0
23

“तीन वर्षांच्या धडाडीच्या कार्याची दखल; मनोज उराडे यांची विदर्भ विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती”

 

गडचिरोली : माहितीचा अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने सक्रिय राहून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे तसेच नागरिकांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे लढा देणारे श्री. मनोज सुरेश उराडे यांची माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिसमित्र समितीच्या विदर्भ विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. उराडे यांनी मागील तीन वर्षे समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना माहिती अधिकाराच्या माध्यमातून प्रशासनातील पारदर्शकता, जनतेच्या समस्या, शासकीय योजनांची अंमलबजावणी, नागरिकांचे हक्क तसेच पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला. त्यांच्या कार्यपद्धतीची दखल घेत समितीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर विभागीय स्तरावरील महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करून “प्रशासनात पारदर्शकता आणि जनतेला न्याय” या भूमिकेतून काम करणारे उराडे यांनी ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. जनहिताच्या विविध विषयांवर पाठपुरावा करताना त्यांनी प्रशासनाकडून उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मनोज उराडे यांची विदर्भ विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नव्या जबाबदारीमुळे गडचिरोलीसह संपूर्ण विदर्भातील माहिती अधिकार कार्यकर्ते, पत्रकार आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना अधिक संघटित व प्रभावी व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तीन वर्षांची जिल्हास्तरीय धडाडीची वाटचाल आता विभागीय नेतृत्वाकडे वळली असून, मनोज उराडे यांच्या नव्या जबाबदारीकडे गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!