Home गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांना फळवाटप व भोजनदान कार्यक्रमाचे...

जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांना फळवाटप व भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन

0
24

जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांना फळवाटप व भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन

 

गडचिरोली : सामाजिक बांधिलकी जपत “माणुसकीचा घास” या उपक्रमांतर्गत प्राध्यापक श्री. रमेशजी बारसागडे यांच्या वाढदिवसानिमित्त भोजनदान रुग्णांना फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक 26 मे 2026 रोजी सकाळी 11.45 वाजता महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे पार पडणार आहे.

 

या उपक्रमाच्या माध्यमातून रुग्णांना आधार व दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून समाजात सेवाभाव आणि माणुसकीचा संदेश देण्याचा उद्देश आहे.

 

या प्रसंगी सर्व लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!