Home गडचिरोली अपघातात देवदूतासारखी धाव — CS MDM डॉ. वर्षा लहाडे मॅडम यांचे तातडीचे...

अपघातात देवदूतासारखी धाव — CS MDM डॉ. वर्षा लहाडे मॅडम यांचे तातडीचे आणि सेवाभावी कार्य

0
48
Oplus_131072

अपघातात देवदूतासारखी धाव — CS MDM डॉ. वर्षा लहाडे मॅडम यांचे तातडीचे आणि सेवाभावी कार्य

 

आज झालेल्या भीषण अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अशा गंभीर परिस्थितीत CS MDM डॉ. वर्षा लहाडे मॅडम यांनी दाखवलेली तत्परता आणि मानवतेची भावना सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.

 

अपघाताची माहिती मिळताच कोणताही विलंब न करता मॅडम यांनी तात्काळ ॲम्बुलन्स पाठवून जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी याची काळजी घेतली. घटनास्थळी पोहोचताच त्यांनी स्वतः पुढाकार घेत जखमी रुग्णांची तपासणी केली आणि गरजेनुसार तात्काळ उपचार सुरू केले.

 

विशेष म्हणजे, कोणताही पदाचा अहंकार किंवा दिखावा न करता मॅडम यांनी स्वतः जखमींना टाके देखील मारले. “सेवा हीच खरी जबाबदारी” या भावनेतून त्यांनी केलेले कार्य उपस्थित नागरिकांच्या मनाला भिडणारे ठरले.

 

या तातडीच्या आणि संवेदनशील निर्णयामुळे अनेक जखमींना वेळेत उपचार मिळाले आणि मोठा अनर्थ टळला. त्यांच्या या कार्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

 

अशा सेवाभावी, कर्तव्यनिष्ठ आणि संवेदनशील अधिकाऱ्यांमुळेच समाजात आशेचा किरण जिवंत राहतो. डॉ. वर्षा लहाडे मॅडम यांचे हे कार्य खऱ्या अर्थाने “मानवतेची सेवा” या संकल्पनेला उजाळा देणारे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!