Home गडचिरोली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मौशीखांब ग्रामपंचायतीची पाहणी; विकासकामांना समितीकडून समाधानाची पावती

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मौशीखांब ग्रामपंचायतीची पाहणी; विकासकामांना समितीकडून समाधानाची पावती

0
22

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मौशीखांब ग्रामपंचायतीची पाहणी; विकासकामांना समितीकडून समाधानाची पावती

 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात आलेल्या विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी पंचायत समिती राळेगावच्या पडताळणी समितीने सोमवार, दि. ११ मे २०२६ रोजी गट ग्रामपंचायत मौशीखांब येथे भेट देत विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

 

यावेळी समितीने ग्रामपंचायत कार्यालयातील दप्तर तपासणीसह विविध विकासकामांची सखोल पाहणी केली. पाहणी समितीत गटविकास अधिकारी पवार साहेब, शाखा अभियंता मुळे साहेब, विस्तार अधिकारी पंचायत म्हस्के साहेब, विस्तार अधिकारी पंचायत पोपडकर साहेब, ग्रामपंचायत अधिकारी भोयर साहेब व अमृतकर साहेब यांचा समावेश होता.

 

तसेच गडचिरोली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पंचायत देव्हारे साहेब, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. कविश्वर बनपुरकर, निकुरे साहेब, ग्रामपंचायत मौशीखांबच्या प्रशासक सौ. रंजिता डंबाजी पेंदाम, ग्रामपंचायत अधिकारी खुशाल नेवारे, प्रशासकीय समिती सदस्य सौ. रुपाली गांधरवार, श्री. विकास उंदिरवाडे, श्री. जयकुमार खेडेकर, सौ. वर्षा तिवाडे, सौ. अंजना कुमरे यांची उपस्थिती होती.

 

याशिवाय तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्री. गणेश दहलकर, उपाध्यक्ष श्री. लोभाजी हर्षे, श्री. संतोष चौधरी (पो.पा. रानखेडा), वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. पांडुरंग समर्थ, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य विभाग कर्मचारी, उमेद अभियानातील ICRP, महिला बचत गट सदस्य, पेसा मोबिलायझर तसेच मौशीखांब, बेलगाव, रानखेडा व मोहटोला येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

समितीने सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध व स्वच्छ-हरित गाव, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग आणि श्रमदानातून लोकचळवळ निर्माण करण्यासंदर्भातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला.

 

यावेळी ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन शेड, आरोग्य उपकेंद्र, अभ्यासिका, पशुवैद्यकीय दवाखाना, धार्मिक स्थळे तसेच खुली व्यायामशाळा आदी ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची तपासणी करण्यात आली.

 

विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व गावातील विकासकामांची माहिती संकलित केल्यानंतर समितीने मौशीखांब ग्रामपंचायत अंतर्गत गावांमध्ये समाधानकारक व उल्लेखनीय काम झाल्याचे नमूद करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

या पाहणीदरम्यान ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर ठाकरे, सुरेश कोलते, हेमंत मोंगरकर आणि प्रतिभा अलाम यांनी विशेष सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!