Home गडचिरोली गडचिरोलीत मेडिकल कौन्सिल निवडणूक; भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या उपस्थितीत...

गडचिरोलीत मेडिकल कौन्सिल निवडणूक; भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या उपस्थितीत डॉक्टर मतदारांशी संवाद

0
26

गडचिरोलीत मेडिकल कौन्सिल निवडणूक; भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या उपस्थितीत डॉक्टर मतदारांशी संवाद

दि. 26/04/2026

गडचिरोली:आज पार पडलेल्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पक्षसमर्थित पॅनलला विजयी करण्यासाठी व्यापक पातळीवर विशेष प्रयत्न करण्यात आले. जिल्ह्यातील डॉक्टर मतदारांशी थेट संपर्क साधत संवाद साधण्यात आला, तसेच मतदानासाठी प्रोत्साहन देत संघटित ताकद उभी करण्यात आली.

या निवडणुकीत डॉक्टर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. वैद्यकीय क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करत, सक्षम नेतृत्वाला संधी देण्याचा संदेश देण्यात आला. पक्षाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या संपर्क मोहिमेमुळे वातावरणात उत्साह आणि सकारात्मकता निर्माण झाली होती.

यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, महाराष्ट्र आदिवासी मोर्चाचे अध्यक्ष डॉ. देवराव होळी,जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी डॉक्टर मतदारांशी थेट संवाद साधत पॅनलच्या बाजूने एकजूट निर्माण करण्याचे आवाहन केले.

विशेष म्हणजे, जिल्ह्यातील डॉक्टर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविताना दिसून आले. या सहभागामुळे पक्षसमर्थित पॅनलच्या विजयाच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे जाणकारांचे मत आहे.

संपूर्ण प्रक्रियेत शिस्तबद्ध नियोजन, प्रभावी संवाद आणि कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!