Home गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

0
18
Oplus_131072

जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

 

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी व प्रशासकीय सुविधांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांबाबत माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी माजी आमदार डॉ. होळी यांनी २००८ पूर्वीच्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी केली. तसेच जिल्ह्यातील महसूल मंडळाच्या प्रशासकीय इमारती व कर्मचारी निवासस्थानांची अवस्था जीर्ण झाली असून तेथे राहणे सुरक्षित नसल्याने तातडीने दुरुस्ती करून कर्मचाऱ्यांना योग्य निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. त्या परिसरातील नागरिकांनाही मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय जिल्ह्यातील काही महसूल मंडळांच्या बेवारस किंवा वापरात नसलेल्या शासकीय इमारतींचा उपयोग अन्य विभागातील ऑफिस साठी व जिप शिक्षक, आरोग्य सेवक / सेविका कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला. गडचिरोली जिल्ह्यात सातबारा उताऱ्यांमध्ये संयुक्त खाते प्रमुख असल्याने अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत असून सातबारा उतारे वेगळे (अलग) करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच आदिवासी बांधवांना देण्यात आलेल्या जमीन पट्ट्यांमध्ये काही ठिकाणी त्रुटी आढळत असल्याने त्या तातडीने दुरुस्त करून पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, असे त्यांनी नमूद केले. गडचिरोली जिल्हा क्रीडांगणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच जुन्या कंत्राटदाराचा प्रस्ताव रद्द करून कामाला गती देण्याची मागणीही त्यांनी केली.

याशिवाय गडचिरोली येथील च्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी संबंधित विषयांवर सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!