Home गडचिरोली सर्वसमावेशक व जनहिताचा अर्थसंकल्प – लिलाधर भरडकर

सर्वसमावेशक व जनहिताचा अर्थसंकल्प – लिलाधर भरडकर

0
20

सर्वसमावेशक व जनहिताचा अर्थसंकल्प – लिलाधर भरडकर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा सर्व घटकांचा विचार करणारा, जनहिताला प्राधान्य देणारा आणि विकासाला गती देणारा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगर परिषद पाणीपुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी व्यक्त केली आहे.

निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः शेतकरी वर्गासाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेती उत्पादन वाढविण्यासाठी विविध योजना, सिंचन सुविधा आणि कृषी क्षेत्राला चालना देणाऱ्या तरतुदी करण्यात आल्यामुळे शेती क्षेत्र अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच गडचिरोलीसारख्या मागास व आदिवासी बहुल जिल्ह्यांच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, दळणवळण व्यवस्था, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग उभारणीस प्रोत्साहन देणाऱ्या योजना, कौशल्य विकास कार्यक्रम आणि नवीन रोजगारनिर्मितीवरही सरकारने विशेष भर दिला आहे. त्यामुळे राज्यातील युवकांना स्वावलंबी होण्याची संधी मिळणार असून आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असे भरडकर यांनी सांगितले.

आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे, दळणवळण व्यवस्था सुधारणे, विदर्भाच्या विकासाला गती देणे तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील मूलभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व घटकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आणि सर्वांगीण विकास साधणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याचे मत लिलाधर भरडकर यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!