Home गडचिरोली राष्ट्रीय  महामार्ग 930 ला गती देण्यासाठी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची...

राष्ट्रीय  महामार्ग 930 ला गती देण्यासाठी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची धानोरा दौऱ्यावर प्रत्यक्ष पाहणी…

0
17

राष्ट्रीय  महामार्ग 930 ला गती देण्यासाठी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची धानोरा दौऱ्यावर प्रत्यक्ष पाहणी…

—————————————

_अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत कामाचा सविस्तर आढावा; दर्जेदार व जलद कामासाठी स्पष्ट निर्देश_

दि. २७ फेब्रुवारी २०२६

ता. धानोरा : धानोरा दौऱ्यावर असताना माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी राष्ट्रीय महामार्ग 930 या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत सविस्तर आढावा घेतला. या महामार्गाच्या कामातील संथ गतीबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कामाचा तपशील जाणून घेतला.

धानोरा, मुरुमगाव, गडचिरोली, राजनांदगाव ते रायपूर या भागांना जोडणारा हा मुख्य मार्ग असून दररोज मोठ्या संख्येने मोटारगाड्या, मोटारसायकली, टॅक्सी, ट्रक व इतर वाहने या मार्गावरून प्रवास करतात. सध्या सुरू असलेल्या कामामुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. धूळ, खड्डे, तीव्र वळणे आणि अपूर्ण काम यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर मा.खा. डॉ. नेते यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी श्री. केळकर तसेच संबंधित कंत्राटदारांशी थेट संवाद साधत कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही कामाची गती मंद का आहे, याबाबत त्यांनी स्पष्ट विचारणा केली.

काम संथगतीने होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत,

नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता कामाला तातडीने गती द्यावी. रस्त्याचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा तत्काळ कार्यरत करावी,” अशा स्पष्ट सूचना दिल्या.

यावेळी वन्यजीव (वाइल्ड लाईफ) संबंधित अडचणींमुळे कामात अडथळे येत असल्याचे कारण पुढे करण्यात आले. मात्र, या अडचणींची योग्य दखल घेत प्रशासनाने आवश्यक परवानग्या व समन्वय साधून कामात कोणतीही कसर ठेवू नये, असेही डॉ. नेते यांनी ठामपणे सांगितले.

हा महामार्ग गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी जीवनवाहिनी ठरणार आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता राखत जलदगतीने पूर्णत्वास नेणे अत्यावश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ. नेते यांच्या या प्रत्यक्ष पाहणीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून लवकरच कामाला अपेक्षित वेग मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

यावेळी पाहणी दरम्यान भाजपा तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, जिल्हा सचिव सारंग साळवे, सुभाष खोबरे, गजानन परचाके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!