Home गडचिरोली फुले वार्डमधील स्वस्त धान्य दुकानासाठी नागरिकांचा आक्रोश; नागरिकांच्या हक्कासाठी नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकरांचा...

फुले वार्डमधील स्वस्त धान्य दुकानासाठी नागरिकांचा आक्रोश; नागरिकांच्या हक्कासाठी नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकरांचा ठाम पुढाकार

0
33

फुले वार्डमधील स्वस्त धान्य दुकानासाठी नागरिकांचा आक्रोश; नागरिकांच्या हक्कासाठी नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकरांचा ठाम पुढाकार

दि. 24/02/2026
प्रभाग क्र. १, फुले वार्डमधील स्वस्त धान्य दुकान (राशन दुकान) मागील दोन वर्षांपासून बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व आक्रोश व्यक्त होत आहे. दुकान दुसऱ्या प्रभागात सुमारे ३ कि.मी. अंतरावर स्थलांतरित केल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व गरजू कुटुंबांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

अनेक वेळा मागणी करूनही प्रश्न प्रलंबित राहिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. “अन्नधान्यासारख्या मूलभूत हक्कासाठी एवढी पायपीट का?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

ही गंभीर बाब प्रभागातील नागरिकांनी नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निबोंरकर व नगरसेवक सागर निबोंरकर यांच्या निदर्शनास आणून दिली.

नागरिकांच्या समस्या ऐकताच नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निबोंरकर यांनी तात्काळ दखल घेतली. “फुले वार्डमधील नागरिकांवर अन्याय सहन केला जाणार नाही. स्वस्त धान्य दुकान पूर्ववत सुरू व्हावे. गरज पडल्यास उच्चस्तरावर पाठपुरावा करू,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निबोंरकर, नगरसेवक सागर निबोंरकर व प्रभागातील नागरिकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तीव्र भावना व्यक्त करत फुले वार्डमध्ये स्थायी स्वरूपात स्वस्त धान्य दुकान तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय बारापात्रे, पवन बावणे, अतुल निपाणे, प्रफुल तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.

नगराध्यक्षांच्या ठोस भूमिकेमुळे प्रशासनाकडून सकारात्मक हालचाली सुरू होईल,लवकरच फुले वार्डमध्ये स्वस्त धान्य दुकान सुरू होईल, , अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

“नागरिकांच्या हितासाठी सदैव तत्पर — अशीच भूमिका नगरपरिषदेकडून कायम राहील,” असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!