Home गडचिरोली हिंदू जागृतीला नवी दिशा; चनकाई नगर येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

हिंदू जागृतीला नवी दिशा; चनकाई नगर येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

0
44

हिंदू जागृतीला नवी दिशा; चनकाई नगर येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

 

दि. 22/02/2026

गडचिरोली: सनातन संस्कृतीचे जतन, धर्माभिमान जागविणे आणि सामाजिक एकतेची भक्कम पायाभरणी करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाज, चनकाई नगर वस्ती व गोकुलनगर यांच्या वतीने रविवारी चनकाई नगर येथे विराट हिंदू संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले. श्रद्धा, परंपरा आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात पार पडलेला हा सोहळा शहरासाठी प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी हनुमान मंदिरात विधिवत पूजनाने झाली. त्यानंतर कलश व पालखी यात्रेला प्रारंभ करण्यात आला. शेकडो महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. भगव्या पताका, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि “जय श्रीराम”, “भारत माता की जय”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

यात्रेदरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शिवपार्वती, राम-लक्ष्मण-सीता-हनुमान, श्रीकृष्ण-राधा, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाई यांच्या झाक्यांचे सादरीकरण करण्यात आले. दिंडीच्या तालावर ही शोभायात्रा संमेलनस्थळी पोहोचली.

संमेलनस्थळी धर्मध्वजारोहण व भारतमाता पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविकात उज्वलाताई वालोदे यांनी हिंदू संमेलनाची आवश्यकता स्पष्ट केली.

परमपूज्य मुरलीधर महाराज (हरणघाट) यांनी आपल्या आशीर्वचनात हिंदू समाजातील ऐक्य, संस्कार व परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. कुटुंबसंस्थेचे जतन, धार्मिक आचार-विचारांचे पालन आणि युवकांनी राष्ट्रभक्ती जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख वक्ते उल्हासजी इटणकर यांनी हिंदू समाजाच्या संघटनशक्तीवर भर देत समाजात ‘पंच परिवर्तन’ रुजविण्याची गरज स्पष्ट केली. अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून दुर्बल घटकांना बळ देणे हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचे त्यांनी नमूद केले.

महिला प्रतिनिधी म्हणून डॉ. चंदाताई कोडवते यांनी भारतीय संस्कृतीतील महिलांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. . जयश्री गावतुरे यांनी कीर्तनातून समाजजागृतीचा संदेश दिला. कार्यक्रमात वस्तीतील ज्येष्ठ नागरिक श्री नानाजी वाढई (वय ९५) यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन प्रिया आखाडे यांनी केले, तर आभार वैशालीताई उसके यांनी मानले. शेवटी भारतमातेची महाआरती, सामूहिक भजन व प्रार्थनेनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

या संमेलनास महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. शहरात या कार्यक्रमाची व्यापक चर्चा सुरू असून हिंदू जागृतीची मशाल अधिक तेजस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!