
नगराध्यक्ष अँड प्रणोती सागर निबोंरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोलीत “मन की बात” भाग 131 उत्साहात; बूथ क्र. 101 व 102 वर भव्य आयोजन
गडचिरोली : देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या लोकप्रिय “मन की बात” कार्यक्रमाचा भाग – 131 गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील बूथ क्र. 101 व 102 येथे उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला.
या प्रसंगी नगराध्यक्ष अँड प्रणोती सागर निबोंरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधत पंतप्रधानांच्या विचारांचा गाभा समाजापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान राष्ट्रहित, विकसित भारताचा संकल्प, स्वच्छता अभियान, आत्मनिर्भर भारत, नवकल्पना, युवा सक्षमीकरण आणि समाजातील सकारात्मक बदल यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. “मन की बात” हा केवळ संवादाचा कार्यक्रम नसून समाजातील प्रेरणादायी कथा आणि जनसामान्यांच्या सहभागातून परिवर्तन घडवून आणणारा उपक्रम असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
नगराध्यक्ष अँड प्रणोती निबोंरकर यांनी आपल्या मनोगतात बूथस्तरावर संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला. प्रत्येक कार्यकर्त्याने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवावी आणि विकासकामांमध्ये सक्रिय भूमिका घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी विकास, सेवा आणि राष्ट्रनिर्माणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. बूथ क्र. 101 व 102 वरील या यशस्वी आयोजनामुळे “मन की बात”चा संदेश घराघरात पोहोचवण्याचा संकल्प अधिक दृढ झाला.








