Home गडचिरोली सिरोंचा तालुक्यातील जप्राबाद ग्रामपंचायतीत रस्त्यावर कचरा व जनावरांमुळे नागरिक त्रस्त

सिरोंचा तालुक्यातील जप्राबाद ग्रामपंचायतीत रस्त्यावर कचरा व जनावरांमुळे नागरिक त्रस्त

0
48
Oplus_131072

सिरोंचा तालुक्यातील जप्राबाद ग्रामपंचायतीत रस्त्यावर कचरा व जनावरांमुळे नागरिक त्रस्त

सिरोंचा : तालुक्यातील जप्राबाद ग्रामपंचायत हद्दीत सध्या रस्त्यावर कचरा टाकणे तसेच गाय-बैल, ट्रॅक्टर उभे करणे आणि बैलबंडी बांधून ठेवण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे गावातील मुख्य रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, काही नागरिक घरगुती कचरा थेट रस्त्यावर टाकत आहेत. त्यातच रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टर उभे करणे व जनावरे बांधून ठेवणे यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रस्त्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, कचरा व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

या संदर्भात ग्रामपंचायत व संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून गावातील रस्ते स्वच्छ व अडथळामुक्त करावेत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!