
गडचिरोली येथे भाजप किसान मोर्चाची केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ वर कार्यशाळा व किसान संमेलन पार पडले
शेतकऱ्यांनी बांबू लागवड करा.- माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा गडचिरोलीच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ विषयावर कार्यशाळा तसेच किसान सम्मेलन आज दिनाक १३-फेब्रुवारी-२०२५ रोजी यशस्वीरीत्या पार पडले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी राहून उपस्थितांना संबोधित केले.
डॉ. उसेंडी यांनी बांबू लागवड त्याचे उपयोग त्याचे उत्पन्न यावर विस्तृत माहिती दिली. त्यांनी शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे फायदे सांगितले, जसे की, बाजाराची मागणी बांबूच्या उत्पादने जसे की फर्निचर, कागद, कोळसा, पिलेट्स इत्यादीची बाजारात वाढती मागणी आहे. बांबूची लागवड करून शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात. त्यासोबत बांबूमुळे पर्यावरणीय पूरक लाभ होतात कार्बन डायऑक्साइड शोषून घेणे , वातावरण शुद्ध करणे., या सर्व घटकामुळे बाबू लागवड करण्याचे आव्हान केले.
सोबतच केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ च्या शेतकरी-केंद्रित घोषणांवरही चर्चा झाली, प्रधानमंत्री धनधान्य योजना आणि किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवणे, तसेच काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत, जसे की कॅन्सरची औषधं , मधुमेहाची औषधं, कपडे, आणि मोबाईल फोन यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी खासदार अशोकजी नेते, प्रमुख अतिथी माजी आमदार तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी, भाजपा जेष्ट नेते बाबूरावजी कोहळे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, लोकसभा समन्व्यक प्रमोद पिपरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विलास भांडेकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका योगिता पिपरे, जेष्ठ महिला नेत्या प्रतिभा चौधरी, साईनाथ बुरांडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंखेने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलास भांडेकर यांनी केले. तर आभार बंडूजी झाडे यांनी मानले.








