Home गडचिरोली लांझेडा येथील हणुमान मंदिरात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना विनम्र अभिवादन

लांझेडा येथील हणुमान मंदिरात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना विनम्र अभिवादन

0
15

लांझेडा येथील हणुमान मंदिरात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना विनम्र अभिवादन

 

राष्ट्रसेवेसाठी समर्पित जीवनाची प्रेरणा — उपस्थित मान्यवरांचे गौरवोद्गार

 

गडचिरोली : भारतीय जनसंघाचे प्रणेते, महान विचारवंत आणि ‘एकात्म मानववाद’ या तत्वज्ञानाचे जनक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त लांझेडा (प्रभाग क्र.2) येथील हणुमान मंदिर परिसरात विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यांच्या राष्ट्रनिष्ठ विचारसरणी, साधेपणा, प्रामाणिकता आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याच्या भूमिकेचा उल्लेख करत त्यांच्या कार्याचा स्मरण करण्यात आले.

 

नगरसेविका मा. कोमल नैताम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला ‘एकात्म मानववाद’ हा आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे विचार दिशादर्शक ठरतात. समाजातील वंचित, दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर केलेले कार्य प्रेरणादायी आहे, असे त्यांनी नमूद केले.

 

हिंदू विचारक सामाजिक कार्यकर्ते गणेश नैताम यांनी देखील त्यांच्या कार्याचा गौरव करत राष्ट्रहित सर्वोच्च मानणाऱ्या या महान नेत्याच्या विचारांचा प्रसार करणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचे सांगितले. भाजयुमो शहर महामंत्री निखिल गुंडमवार यांनी युवकांनी त्यांच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन समाजकार्य व राष्ट्रसेवेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

 

यावेळी लक्की भांडेकर, साहिल पिपरे,कितीक भांडेकर तसेच परिसरातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि उपस्थितांनी राष्ट्रसेवेचा संकल्प व्यक्त केला.

 

स्मृतिदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचे पुनःस्मरण करत समाजकार्याची प्रेरणा घेण्याचा संदेश देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!