Home गडचिरोली लेखा (ता. धानोरा) येथे रेशन दुकानाच्या समस्यांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा...

लेखा (ता. धानोरा) येथे रेशन दुकानाच्या समस्यांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा ग्रामस्थांशी थेट संवाद

0
16

लेखा (ता. धानोरा) येथे रेशन दुकानाच्या समस्यांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा ग्रामस्थांशी थेट संवाद

 

 

गडचिरोली: धानोरा तालुक्यातील लेखा गावात आज आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सदिच्छा भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर — शासकीय रास्त भाव धान्य दुकानाच्या कारभारासंदर्भातील तक्रारी व समस्या आमदारांसमोर मोकळेपणाने मांडल्या.

 

रेशन दुकानावर धान्य वेळेवर न मिळणे, प्रमाणात तफावत, अपुरी माहिती, तसेच व्यवहारातील अडचणी यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या ग्रामस्थांनी सविस्तरपणे मांडल्या. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सर्व तक्रारी गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागाकडे तात्काळ पाठपुरावा करून योग्य व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

 

“गरीब व गरजू नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ अडथळ्याविना मिळालाच पाहिजे. रेशन दुकानातील कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही,” असे ठाम मत यावेळी आमदार नरोटे यांनी व्यक्त केले.

 

याच बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी गावातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, रोजगार व इतर विकासाशी संबंधित विविध विषयांवरही चर्चा केली. ग्रामस्थांच्या प्रश्नांना प्राधान्य देत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून, प्रशासनाकडून लवकरच ठोस कार्यवाही होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!