Home गडचिरोली रामनगर येथे श्री प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव उत्साहात साजरा! नगराध्यक्ष प्रणोती...

रामनगर येथे श्री प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव उत्साहात साजरा! नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांची प्रमुख उपस्थिती

0
35

रामनगर येथे श्री प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव उत्साहात साजरा!

नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांची प्रमुख उपस्थिती

 

31/01/2026

 

*गडचिरोली :* दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री प्रभू विश्वकर्मा पांचाळ समाज सेवा समिती, रामनगर, गडचिरोली यांच्या वतीने श्री प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव अत्यंत भक्तिभाव व उत्साहात साजरा करण्यात आला. या जयंती उत्सवाला नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

 

जयंतीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात समाज बांधवांच्या एकत्रीकरणाने करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने कलश यात्रा व पालखी मिरवणूक काढण्यात आली. समाजातील महिला, युवक व लहान मुले मोठ्या उत्साहात या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

 

यानंतर श्री प्रभू विश्वकर्मा मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी *समाजातील महिलांनी नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले*. तसेच गोपाळकाला कार्यक्रम, लहान मुला-मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, बक्षीस वितरण आणि शेवटी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

 

या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रकाश किरमीरवार यांनी भूषविले. तर उपाध्यक्ष निलेश बद्दलवार, सचिव प्रफुल विरगंमवार, कोषाध्यक्ष सचिन चोलूरवार, सहसचिव रोशन यज्ञुरवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच योगेश देवजवार, महेश मुरमुरवार, विजेंद्र कंठिवार, रोशन येरोजवार यांच्यासह इतर सदस्य, मार्गदर्शक मंडळी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांनी समाजाच्या एकतेचे, परंपरेचे व सामाजिक कार्याचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे समाजात एकोपा वाढतो व नव्या पिढीला संस्कार मिळतात, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. तसेच सर्व समाजबांधवांना श्री प्रभू विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

 

संपूर्ण कार्यक्रम शांततापूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला. उपस्थित नागरिकांनी आयोजकांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!