
“महाराष्ट्राच्या प्रगतीचा ठाम आवाज; सेवाभाव आणी जन विश्वासाचे प्रतीक, कणखर नेतृत्वाला नमन! नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकर
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात आपल्या कणखर नेतृत्वाने, स्पष्ट भूमिकेने आणि विकासाभिमुख दृष्टीकोनाने अढळ स्थान निर्माण करणारे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राज्याच्या राजकारणातील एक प्रभावी आणि विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात. युवकांचे प्रेरणास्थान आणि समाजाच्या प्रत्येक घटकासाठी मार्गदर्शक ठरलेले अजितदादा पवार यांचे कार्य म्हणजे केवळ राजकारण नव्हे, तर जनतेच्या विश्वासावर उभे राहिलेले सेवाव्रत आहे.
कठोर निर्णयक्षमता, प्रशासकीय अनुभव आणि कामातील सातत्य यामुळे त्यांनी जनतेच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. सामान्य माणसाच्या दुःखाशी आपुलकीने जोडले जाणारे नेतृत्व, शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहणारी भूमिका आणि परिणामकारक प्रशासन हे अजितदादांच्या कार्यशैलीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
राज्याच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणारे अजितदादा पवार हे केवळ प्रशासक नाहीत, तर समाजाच्या नाडीस्पंदनाशी जोडलेले लोकनेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवकांना सकारात्मक दिशा, आत्मविश्वास आणि सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. महाराष्ट्राच्या विकासप्रक्रियेत त्यांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या विचारांनी आणि कार्याने अनेक पिढ्यांना दिशा दिली आहे.
राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत कार्यरत असलेले हे नेतृत्व महाराष्ट्राच्या इतिहासात सदैव आदराने स्मरणात राहील. त्यांच्या विचारांना, कार्याला आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाला हे नम्र नमन.
नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकर
नगरसेवक सागर निबोंरकर
यांच्यावतीने माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावनापूर्ण श्रद्धांजली, आदरांजली व मनापासून अभिवादन. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या नेतृत्वास सदैव यश लाभो, हीच सदिच्छा.








