
गडचिरोलीत ‘जॉबशिक्षा एज्युकेशनल कन्सल्टिंग’च्या नवीन शाखेचे भव्य उद्घाटन
दिं. 27/01/2026
गडचिरोली :NEET, JEE, MHT-CET तसेच इतर सर्व CET परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शन व अचूक अॅडमिशन सेवा देणाऱ्या जॉबशिक्षा एज्युकेशनल कन्सल्टिंग या नामांकित संस्थेच्या नवीन शाखेचे उद्घाटन गुरुवार, दि. 29 जानेवारी 2026 रोजी गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात होत आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला दिशा देणारी जॉबशिक्षा संस्था गेल्या काही वर्षांत विश्वासार्हतेचे प्रतीक ठरली आहे. सन 2025–26 या शैक्षणिक वर्षात संस्थेच्या माध्यमातून 150 हून अधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय (Medical) अभ्यासक्रमात, तर 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी (Engineering) क्षेत्रात प्रवेश मिळालेला आहे. या उल्लेखनीय यशाच्या जोरावर आता गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ही नवी शाखा सुरू करण्यात येत आहे.
ही नवीन शाखा
सातपुते बिल्डिंग, दुसरा मजला, अॅनिमॅटो टॅटू अॅण्ड आर्ट्सच्या शेजारी, आयटीआय चौक, झाशी राणी नगर, चंद्रपूर रोड, गडचिरोली
येथे कार्यान्वित होणार आहे.
ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक मार्गदर्शन, योग्य कॉलेज निवड, प्रवेश प्रक्रिया, समुपदेशन तसेच करिअर नियोजनाची सुस्पष्ट दिशा देणे हा या शाखेचा मुख्य उद्देश आहे. जॉबशिक्षा संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे स्वप्नातील डॉक्टर व अभियंता होण्याचे स्वप्न साकार होत असल्याने पालकवर्गातही संस्थेबद्दल मोठा विश्वास निर्माण झाला आहे.
सदर उद्घाटन समारंभास विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या जॉबशिक्षा एज्युकेशनल कन्सल्टिंगच्या शाखा नागपूर, पुणे, चंद्रपूर, अहेरी, लखनऊ येथे यशस्वीपणे कार्यरत असून आता गडचिरोली या यादीत सामील होत आहे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
📞 9370064495 / 9359149137
🌐 www.jobshiksha.com








