चंद्रपूर
राज्यमार्ग असलेल्या धाबा गोंडपिंपरी मार्गाचे काम मागील पाच वर्षांपासून अद्यापही पूर्णत्वास गेलेल नाही.या मार्गांवरून वीस पेक्षा अधिक गावातील नागरिक प्रवास करतात. मार्गावर ठिकठिकाणी गिट्टी पसरलेली आहे. अनेक ठिकाणी मार्ग उखळला आहे. यामुळे या मार्गावर अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. सरकार,प्रशासन यांच्या होणाऱ्या दुर्लक्षामुळे गोडपिंपरी काँग्रेस संतप्त झाली आहे. उदयाला ( मंगळवार ) काँग्रेसकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे सहभागी होणार आहेत.
काँग्रेसने काही दिवसांपूर्वी मार्गाचा प्रश्न घेऊन प्रशासनाला निवेदन दिलं होतं. मार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या इशारा दिला होता. मात्र काम पूर्ण न केल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या आंदोलनात मोठ्या संख्येने जनतेने उपस्थित राहावे असे आव्हान तुकाराम झाडे,निलेश संगमवार, देविदास सातपुते, अशोक रेचणकार, नामदेव सांगडे यांनी केले आहे.

