
पदवीधर निवडणुकीत सुधाकर कोहळे यांना विजयी करण्याचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे आवाहन
पदवीधर मतदारांना पॉम्पलेटचे वाटप करून भाजपाच्या अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी प्रचार
गडचिरोली : पदवीधर निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. सुधाकर कोहळे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी पदवीधर मतदारांशी संपर्क साधत त्यांना पॉम्पलेटचे वाटप केले. यावेळी त्यांनी पदवीधर मतदारांना भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले.
पदवीधर मतदारांपर्यंत भाजपाची भूमिका आणि उमेदवाराचा संदेश पोहोचविण्यासाठी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधत प्रचार केला. पदवीधर मतदारांनी भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देऊन सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भाजपाच्या अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.








