
पलासपूर येथे उद्या भव्य सत्संग समारोह; माजी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे व मा.सं.म.प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांचा जाहीर सत्कार
अनुकूल ठाकूर सत्संग सेवा मंडळ जिल्हा गडचिरोलीतर्फे आयोजन; दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सत्संग व प्रवचन
तालनवमी सप्ताहानिमित्त भक्तिमय सोहळा; समारोहानंतर भक्तजन व मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन
घोट/चामोर्शी, दि. १९ सप्टेंबर २०२६ : चामोर्शी तालुक्यातील रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत मौजा पलासपूर येथे अनुकूल ठाकूर सत्संग सेवा मंडळ, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने तालनवमी सप्ताहानिमित्त रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी भव्य सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्यानिमित्त दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत राज्य तसेच परराज्यातून येणाऱ्या आदरणीय सत्संगी व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्संग व प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील अनुकूल ठाकूर भक्त, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या भव्य सत्संग समारोहाच्या निमित्ताने अनुकूल ठाकूर सत्संग सेवा मंडळ, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार अशोक नेते, गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
सत्संग व सत्कार सोहळ्यानंतर पलासपूर येथील समारोहस्थळी उपस्थित सर्व भक्तजन, निमंत्रित पाहुणे आणि मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून तालनवमी सप्ताहानिमित्त होणाऱ्या या सोहळ्यासाठी आयोजकांकडून आवश्यक तयारी करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला सर्व आमंत्रित व निमंत्रित पाहुणे, जिल्ह्यातील अनुकूल ठाकूर भक्त, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सत्संग व प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर पलाश घरामी, पंकज सेठ घरामी तसेच अनुकूल ठाकूर सत्संग सेवा मंडळ, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.








