Home Breaking News नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांचा ‘रेस्ट हाऊसचा राजा’ गणेश मंडळातर्फे जल्लोषात वाढदिवस...

नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांचा ‘रेस्ट हाऊसचा राजा’ गणेश मंडळातर्फे जल्लोषात वाढदिवस साजरा

0
30
Oplus_131072

नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांचा ‘रेस्ट हाऊसचा राजा’ गणेश मंडळातर्फे जल्लोषात वाढदिवस साजरा

केक कापून दिल्या शुभेच्छा; इंदिरा गांधी चौकातील PWD रेस्ट हाऊस परिसरात उत्साहाचे वातावरण

गडचिरोली, दि. १९ सप्टेंबर २०२६ : गडचिरोली शहराच्या नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांचा वाढदिवस इंदिरा गांधी चौकातील PWD रेस्ट हाऊस येथे ‘रेस्ट हाऊसचा राजा’ गणेश मंडळाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांच्या उपस्थितीत केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांनी उपस्थितांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

इंदिरा गांधी चौकातील PWD रेस्ट हाऊस परिसरात वर्षानुवर्षे गणरायाची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा जपली जात आहे. ‘रेस्ट हाऊसचा राजा’ गणेश मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. पूजा-अर्चना, आरती, गणरायाचे दर्शन तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन ही या उत्सवाची विशेष परंपरा आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांचा वाढदिवस आल्याने मंडळाने या आनंदाच्या क्षणाला विशेष स्वरूप दिले. गणरायाच्या साक्षीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

गणेशोत्सवाला धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रमांची जोड देण्याची परंपराही मंडळाने कायम ठेवली आहे. याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणीसह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी आयोजक व ‘रेस्ट हाऊसचा राजा’ गणेश मंडळाचे अजय तुम्मावार, राहुल निलमवार, प्रसाद कवासे, अभिजीत अंडलकर, ऋषिकेश बारापात्रे, रूपेश निलमवार,विक्की कोत्तावार,प्रविऩ न्यालेवार, राहुल राजूरकर, स्वप्निल खांडरे, सुधीर रोहणकर, आशिष नैताम, प्रफुल धारणे, अनिल बजाज, अक्षय बोदलकर, आशुतोष गोरले, शुभम रोहणकर, मयूर मुनघाटे, अंकुश मारभते, प्रशांत देशमुख, अक्षय भिशनूरकर आणि प्रवीण नवघरे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, ‘रेस्ट हाऊसचा राजा’च्या दर्शनासाठी शहरातील नागरिकांची उपस्थिती लाभत असून, महाप्रसादासह विविध कार्यक्रमांमुळे परिसरात भक्तिमय व उत्साही वातावरण आहे. गणेशोत्सवाची वर्षानुवर्षांची परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्या वाढदिवसाचा आनंद यांचा सुंदर संगम यानिमित्ताने पाहायला मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!