
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे OSD अनिरुद्ध पालकर यांच्या हस्ते शिवशंभू युनियनच्या सदस्यांचा सत्कार
शिवशंभू स्कूल व्हॅन चालक-मालक युनियनच्या पदाधिकारी-सदस्यांचा शाल व आरती पुस्तक देऊन गौरव
गडचिरोली : शिवशंभू स्कूल व्हॅन चालक-मालक युनियनच्या पदाधिकारी व सदस्यांचा मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) अनिरुद्ध पालकर यांच्या हस्ते शाल व आरती पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवशंभू स्कूल व्हॅन चालक-मालक युनियनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश नैताम यांच्यासह युनियनच्या विविध पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती. स्कूल व्हॅन चालक-मालकांच्या संघटनात्मक कार्याच्या निमित्ताने उपस्थित सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संदीपभाऊ मौजे, अजयभाऊ करपे, योगेशभाऊ आखाडे, संतोषभाऊ येदुलवार, संतोषभाऊ मडावी, संतोषभाऊ भोयर, शैलेशभाऊ नामेवार, युवराजभाऊ नैताम, सलमानभाऊ पठाण, विजुभाऊ मुलकलवार, प्रमोदभाऊ तिजारे यांच्यासह शिवशंभू स्कूल व्हॅन चालक-मालक युनियनचे सदस्य उपस्थित होते.
OSD अनिरुद्ध पालकर यांच्या हस्ते उपस्थित सदस्यांना शाल व आरती पुस्तक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सत्कारामुळे युनियनच्या सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी स्कूल व्हॅन चालक-मालकांच्या विविध विषयांवरही उपस्थितांमध्ये संवाद झाला. संघटितपणे काम करत विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक, चालक-मालकांमधील समन्वय आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग यांना महत्त्व देण्याची भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.








