Home Breaking News रेस्ट हाऊसचा राजा’ गणेश मंडळाची चित्रपटप्रेमींना खास भेट; हनूमान अंश चित्रपट ₹150...

रेस्ट हाऊसचा राजा’ गणेश मंडळाची चित्रपटप्रेमींना खास भेट; हनूमान अंश चित्रपट ₹150 चे तिकीट फक्त ₹70 मध्ये

0
17
Oplus_131072

‘रेस्ट हाऊसचा राजा’ गणेश मंडळाची चित्रपटप्रेमींना खास भेट; हनूमान अंश चित्रपट ₹150 चे तिकीट फक्त ₹70 मध्ये

श्री नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ चित्रपटाच्या तिकिटावर विशेष सवलत

आजपासून 24 सप्टेंबरपर्यंत मिळणार सवलतीचा लाभ; तिकीट घेताना ‘रेस्ट हाऊसचा राजा गणेश मंडळ’ हे नाव सांगणे आवश्यक

गडचिरोली, दि. 22 सप्टेंबर 2026 : सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने नागरिकांशी नाते जपणाऱ्या ‘रेस्ट हाऊसचा राजा’ गणेश मंडळाच्या सौजन्याने गडचिरोलीकरांसाठी खास उपक्रम राबविण्यात येत आहे. श्री नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना तिकिटावर विशेष सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

धानोरा रोडवरील स्वराज जिमच्या बाजूला असलेल्या नगर परिषद टॉकीजमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत असून, तिकीट घेताना ‘रेस्ट हाऊसचा राजा गणेश मंडळ’ असे नाव सांगितल्यास नियमित ₹150 किमतीचे तिकीट केवळ ₹70 मध्ये मिळणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

ही विशेष सवलत आज दि. 22 सप्टेंबरपासून दि. 24 सप्टेंबर 2026 पर्यंत उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे गडचिरोलीतील चित्रपटप्रेमी आणि भाविकांना तीन दिवस या विशेष सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा तसेच श्री नीम करोली बाबा यांच्या जीवनकार्याची ओळख गडचिरोलीकरांना व्हावी, या उद्देशाने ‘रेस्ट हाऊसचा राजा’ गणेश मंडळाच्या सौजन्याने ही विशेष सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी जोडलेले राहण्याचा प्रयत्न ‘रेस्ट हाऊसचा राजा’ गणेश मंडळाकडून केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोलीतील नागरिकांना सवलतीच्या दरात हा चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!