
भारतीय जनता पार्टी जिल्हा व शहरतर्फे नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या वाढदिवस जल्लोषात साजरा; पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा उसळला जनसागर
आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवती राईस मिल येथे भव्य सोहळा; जिल्हा व शहर भाजपाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
केक कापून, पुष्पगुच्छ देत शुभेच्छांचा वर्षाव; शहरभर विविध सेवाभावी उपक्रमांतून वाढदिवसाला सामाजिक सेवेची जोड
गडचिरोली, दि. २० सप्टेंबर २०२६ : भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा व शहरच्या वतीने गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांचा वाढदिवस भगवती राईस मिल येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा भाजपा गडचिरोली जिल्हा प्रभारी कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यास जिल्हा व शहर भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त भगवती राईस मिल परिसरात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अक्षरशः जनसागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्हा आणि शहराच्या विविध भागांतून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला होता. शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि पुढील वाटचालीस यश लाभावे, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
कार्यक्रमाला आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, रेखाताई डोंळस, नगर परिषद बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, नगर परिषद उपाध्यक्ष निखिल चरडे यांच्यासह भाजपा जिल्हा व शहरातील विविध पदाधिकारी, नगर परिषदेचे सभापती, नगरसेवक-नगरसेविका तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगवती राईस मिलमध्ये शुभेच्छांचा वर्षाव
वाढदिवस सोहळ्यानिमित्त सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा व शहर भाजपा संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगर परिषदेतील लोकप्रतिनिधी या निमित्ताने एकत्र आल्याने कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले.
वाढदिवसाला सेवाभावाची जोड
नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा शहरतर्फे शहरातील विविध भागांत सेवाभावी उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले. नागरिकांच्या हिताचे विविध उपक्रम राबवत वाढदिवसाला सेवाभावाची जोड देण्यात आली.
एकीकडे भगवती राईस मिल येथे जिल्हा व शहर भाजपाच्या वतीने पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत वाढदिवसाचा जल्लोष, तर दुसरीकडे शहराच्या विविध भागांत सेवाभावी उपक्रम, अशा दुहेरी स्वरूपात नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आले.








