
गृह राज्यमंत्री पंकजजी भोयर यांचा १६ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्हा दौरा; जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांचे सर्व मंडल अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना उपस्थितीचे आवाहन
मंडल अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद; सायंकाळी ४ वाजता आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कार्यालयात मार्गदर्शन
गडचिरोली | प्रतिनिधी : राज्याचे गृह राज्यमंत्री मा. पंकजजी भोयर साहेब हे रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांनी सर्व मंडल अध्यक्षांना आपल्या-आपल्या मंडळातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना दौऱ्याची माहिती देऊन बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना करण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रम पत्रिकेनुसार सायंकाळी ठीक ४ वाजता आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कार्यालयात राज्यमंत्री पंकजजी भोयर हे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून चर्चा व मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीस सर्व संबंधित पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्षांनी व मंडलातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील समस्या, विकासकामे अथवा अन्य महत्त्वाच्या विषयांबाबत निवेदन सादर करावयाचे असल्यास, त्यांनी संबंधित विषयाचे निवेदन तयार करून ते सोबत घेऊन यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सर्व मंडल अध्यक्षांनी आपल्या मंडळातील प्रमुख पदाधिकारी यांना दौऱ्याची माहिती तातडीने द्यावी आणि दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कार्यालयात वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचना कराव्यात, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांनी केले आहे.








